प्रेमा तुझा रंग कसा, क्षणात भुलवी सगळे
प्रेमा तुझा रंग कसा
क्षणात भुलवी सगळे
करी स्वतःस जगा वेगळे
निर्णय ते सारे चुकवी
हृदयाचा ठोका हुकवी
प्रेमा तुझा रंग कसा
आडवे तिडवे पाऊले
हरिणीची चाल चाले
परिपुर्ण वस्त्र हे ठरले
कपडे दोन भागात उरले
प्रेमा तुझा रंग कसा
लेख वाचणे बंद
शायरीत मन हे गुंग
ना सख्यांसमवेत हसणे
खोलीत एकटेच बसणे
प्रेमा तुझा रंग कसा
बहिणी - भावांशी कट्टी
खिडकीच्या कोन्याशी गट्टी
ना अभ्यास हवा मुळीच
ना घरात लक्ष मुळीच