अंकुरित होते बीज जेव्हा
वरूणराज गुप्त झाले
कापणीला उभं शेत कधी
अतिवृष्टिनं नष्ट केले
वेदनेला कसे हुंदके आले, दुःख सार्वत्रिक झाले
शिकवून तयार केली पोरं
बेकारीने फार त्रस्त झाले
लेक होती उपवर लाडी
सावकारानं सारे फस्त केले
इभ्रतीला जसे तडे गेले, दुःख सार्वत्रिक झाले
फुलला महागाईचा बाजार
पोटाचे फाकेही मस्त झाले
कष्टाने उपजले सोने देवा
पिकांचे भाव अस्तास गेले
विश्वासाला कंपन सुटले, दुःख सार्वत्रिक झाले
नांदली समृद्धी जिथे
रोगराईनं आज ग्रस्त केले
मान होता पोशिंदा - राजा
वरदान आता शाप झाले
वैभव ते हरपून गेले, दुःख सार्वत्रिक झाले
झोळी रितीच आयुष्याची
विष - गळफास आप्त झाले
यात्रा निघाली अंतिम तेव्हा
कर्जाचे ओझे माफ केले
नियतीला क्रुर हसू आले, दुःखाचे नाव बळीराजा झाले