जीवनाचा खडतर प्रवास - मराठी कविता

जीवनाचा खडतर प्रवास, मराठी कविता - [Jeevanacha Khadtar Pravas, Marathi Kavita] म्हटलं तर सगळं काही, म्हटलं तर काहीच नाही.
जीवनाचा खडतर प्रवास - मराठी कविता | Jeevanacha Khadtar Pravas - Marathi Kavita
म्हटलं तर सगळं काही
म्हटलं तर काहीच नाही
असंच असतं हे जगणं
जिथे जाणं तिथे लढणं

पुढे काय होणार कोणालाच माहीत नाही
तरीही का असते प्रत्येकाला घाई
करायची असते प्रत्येकाला जीवनाची जडणघडण
कधी मिळे कधी न मिळे प्रयत्नांना यशस्वी वळण

लाभतो जीवनात आपल्याला
अनेक चांगल्या - वाईटांचा सहवास
पण शेवटी आपल्यालाच तरून जावा
लागतो जीवनाचा हा खडतर प्रवास

1 टिप्पणी

  1. विविध विषयावर कविता आणि सुंदर लिखाणाचे स्वागत आहे
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.