ती - मराठी कविता

ती, मराठी कविता - [Tee, Marathi Kavita] ती काळजाच्या कागदावर, दोन शब्द गिरवून गेली.
ती - मराठी कविता | Tee - Marathi Kavita
ती काळजाच्या कागदावर
दोन शब्द गिरवून गेली
ती गोड ओठांच्या कळ्यांवर
हात फिरवून गेली

ती विस्कटलेल्या माझ्या मनाच्या
तुकड्यांना पटकन आवरुन गेली
माझ्या भरकटणार्‍या पावलांना
ती क्षणात सावरुन गेली

एका कोर्‍या कागदावर ओळी सोडून
काहूर लावून गेली
ती परतीचा निरोप घेऊन
हूर - हूर देऊन गेली

तिच्या खळ्यांवर खिळणारी
माझी नजर घेऊन गेली
ती माझ्या ओठावरचं हसू चोरुन
डोळ्यात अश्रू ठेवून गेली

तिला सांगितली स्वप्ने सप्तपदीची
तेव्हा ती हात सोडून गेली
मी पाहतच राहिलो तिच्याकडे
आणि ती पाठ फिरवून गेली

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.