केळ्याची कोशिंबीर - पाककृती

केळ्याची कोशिंबीर, पाककला - [Kelyachi Koshimbir, Recipe] उपवासाला चालणारी आंबड, गोड आणी किंचीतशी तिखट अशी केळ्याची कोशिंबीर.
केळ्याची कोशिंबीर - पाककला | Kelyachi Koshimbir - Recipe

आंबड, गोड आणि किंचीतशी तिखट अशी उपवासाला चालणारी केळ्याची कोशिंबीर

‘केळ्याची कोशिंबीर’साठी लागणारा जिन्नस

(२ व्यक्तिंसाठी)
 • २ पिकलेली केळी
 • अर्धा वाटी दही
 • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • १ चमचा साखर
 • चवीनुसार मीठ
 • बारीक चिरलेली कोथिंबीर

‘केळ्याची कोशिंबीर’ची पाककृती

 • केळीची साले काढून मध्यम आकारात तुकडे करून घ्या.
 • एका वाटीत ‘दही’ घेऊन त्यामध्ये ‘साखर’‘चवीनुसार मीठ’ व आवडत असल्यास त्यामध्येच ‘हिरवी मिरचीचे तुकडे’ टाकून दही एकजीव करून घ्या.
 • दह्याच्या या मिश्रणात ‘मध्यम आकारात चिरलेली केळी’ टाकुन व्यवस्थित एकजीव करून घ्या.
 • व्यवस्थित एकजीव झालेल्या या मिश्रणात आता ‘बारिक चिरलेली कोथिंबीर’ घालून पुन्हा एकजीव करून घ्या.
 • आपली ‘केळ्याची कोशिंबीर’ तयार आहे.
वाढण्यापूर्वी ‘केळ्याची कोशिंबीर’ फ्रिजमध्ये ठेवून थोडी थंड करून वाढल्यास अधिक छान लागते.
केळी कापल्यानंतर थोड्याच वेळात काळी पडू लागते, त्यामुळे ही ‘केळ्याची कोशिंबीर’ जेवणाच्या वेळेचा अंदाज घेऊन तात्काळ बनविल्यास उत्तम.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.