मीच नसेल जेव्हा माझ्यात - मराठी कविता

मीच नसेल जेव्हा माझ्यात, मराठी कविता - [Meech Nasel Jevha Majhyat, Marathi Kavita] माझा चंद्र माझे तारे, तुच असशी माझे सारे, कला माझी कृती माझी, तुझ्याविन कोण उरे.
मीच नसेल जेव्हा माझ्यात - मराठी कविता | Meech Nasel Jevha Majhyat - Marathi Kavita
माझा चंद्र माझे तारे
तुच असशी माझे सारे
कला माझी कृती माझी
तुझ्याविन कोण उरे

हट्ट्‍ माझा, छंद माझा
तुझ्याशिवाय न मझ काही
कागद माझा कलम माझी
कलमेमधली तुच शाही

आवड माझी निवड माझी
तुचं माझ्यासाठी सगळं
दुनिया माझी तुच असशी
न पाहिजे मज काही वेगळं

डोळे माझे, मन माझे
चित्र फक्त तुझेच दिसे
शब्द माझे गीत माझे
सारे काही तुच असे

विचार माझे आचार माझे
तुज सोडून काहिच नाही
स्वप्न माझे, सत्य माझे
वाट फक्त तुझीच पाही

आनंद माझा सुख माझे
सामावले तुझ्यात सारे
भरती माझी, ओहोटी माझी
तुच माझे सागर किणारे

शंका माझी निरसन माझे
आता फक्त तुच एक
कल्लोळ माझा, गोंधळ माझा
तुझ्याविना नाही मज

सुरूवात माझी शेवट माझा
तुज वाचून मज अर्थ नाही
प्रश्न माझा, उत्तर माझे
निघता निघेना तर्क काही

जीव माझा, मन माझे
हे इतके अडकले तुझ्यात
तेव्हाच नसेल फक्त तुझे
ते मीच नसेल जेव्हा माझ्यात

५ टिप्पण्या

 1. Khup sundr kvita.....
  Apratim
  1. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
  2. Dhanyavad...
 2. Khup sundr kvita.....
  Apratim
  1. आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.