मनाच्या खोल दरीत - मराठी कविता

मनाच्या खोल दरीत, मराठी कविता [Manachya Khol Darit, Marathi Kavita] - फार गर्दी आहे नजरेसमोर, मी मात्र रस्त्याने चालतांना देखील.
मनाच्या खोल दरीत - मराठी कविता | Manachya Khol Darit - Marathi Kavita

फार गर्दी आहे नजरेसमोर
मी मात्र रस्त्याने चालतांना देखील
बंजी जंपींग करतोय
मनाच्या खोल दरीत

चांगल्या वाईटाचा समतोल
नफ्या तोट्याचा ताळेबंद
शोध प्रतिशोधाचा प्रवास

मीऽऽऽ मीऽऽऽ चा शुकशुकाट
हा असा काहीसा क्रम आहे
ह्या गर्दीसोबत चालतांना

फाऽऽऽर फारच गर्दी आहे नजरेसमोर
मी मात्र रस्त्याने चालतांना देखील
बंजी जंपींग करतोय मनाच्या खोल दरीत


मनाच्या खोल दरीतहर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

1 टिप्पणी

  1. दर्जेदार वाटली आपली कविता...
    🙏
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.