Loading ...

मन आता थकले - मराठी कविता (चैताली गिते)

मन आता थकले - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री श्रीमती चैताली गिते यांची मन आता थकले ही मराठी कविता.

मन आता थकले - मराठी कविता (श्रीमती चैताली गिते)

अंतर्मनाच्या थकव्याची आणि भावनांच्या बोथट होत जाण्याची ही हळवी आत्मस्वीकृती आहे...

मन आता थकले

श्रीमती चैताली गिते (मराठा हायस्कूल, नाशिक)

मन सतत हसण्याचा मुखवटा घालत राहते. दुःख इतके खोल जाते की वेदनाही जाणवत नाही. दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःचे अस्तित्व हरवते. शेवटी मन भावनाशून्य, नि:शब्द आणि थकलेले उरते.

मन आता थकले, शब्दांच्याही समोर हरले. हसत राहिले, सावरत राहिले, “सगळं ठीक आहे” म्हणत स्वतःलाच खोटं सांगत राहिले... मन आता थकले... दुःख इतके खोल गेले की वेदनेलाही वेदना वाटेनाशी झाली. तक्रार नाही, आवाज नाही— फक्त हळूहळू भावना बोथट होत गेल्या... मन आता थकले, दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःचे जगणे विसरून गेले... स्वतःचे जगणे कुठे हरवले हे कळलेच नाही... भावनांची किंमत आता मनात राहिली नाही; शब्दांनाही आता आयुष्यात जागा उरली नाही... मन आता थकले... मनाला संवेदना नाही, वेदना नाही; मन आता रडतही नाही... वेदना इतकी खोल गेली आहे की आता दुखणं सुद्धा ओळखीचं वाटत नाही...

संपादकीय विश्लेषण

ही कविता अंतर्मनातील दडपलेल्या वेदनांचा प्रवास दाखवते. “मन आता थकले” ही पुनरुक्ती केवळ थकव्याची जाणीव नसून, ती एक खोल आत्मस्वीकार आहे. सुरुवातीला मन समाजासमोर हसत राहते, स्वतःलाच खोटं सांगत राहते; परंतु कालांतराने दुःख इतके गहिरे होते की संवेदनाच बोथट होतात. येथे वेदनेचा परमोच्च बिंदू म्हणजे वेदनाही न जाणवणे—ही भावनिक शून्यता अधिक भेदक ठरते. दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःचे अस्तित्व हरवणे ही आधुनिक जीवनातील एक सामान्य पण वेदनादायक अवस्था आहे. शेवटी कविता मनाच्या अशा स्थितीवर येऊन थांबते जिथे अश्रूही थांबतात—आणि हाच नि:शब्दपणा तिच्या भावविश्वाची खरी तीव्रता व्यक्त करतो.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची