Loading ...

नात्यांची खरी ओळख - स्फुटलेखन (मोहिनी उत्तर्डे)

नात्यांची खरी ओळख (स्फुटलेखन) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिका मोहिनी उत्तर्डे यांचे नात्यांची खरी ओळख हे स्फुटलेखन.

नात्यांची खरी ओळख - स्फुटलेखन (मोहिनी उत्तर्डे)

मानवी नात्यांच्या चढउतारांतून योग्य व्यक्तीची आणि योग्य साथीसंबंधीची निवड ओळखण्याचा विचार मांडणारा नात्यांची खरी ओळख हा स्फुट लेख...

नात्यांची खरी ओळख

मोहिनी उत्तर्डे (महाराष्ट्र, भारत)

या स्फुट लेखात काय वाचाल

• परिस्थितीनुसार माणसं बदलतात, ही जीवनाची वस्तुस्थिती आहे. • यशात साथ देणारे अनेक असतात, पण अपयशात टिकणारेच खरे ठरतात. • नात्याचं नाव नव्हे, तर संकटात दिलेली साथ महत्त्वाची असते. • योग्य व्यक्तीची योग्य वेळी केलेली निवडच खऱ्या शहाणपणाचं लक्षण आहे.

निवड ही आयुष्यातील खूप महत्त्वाची पायरी असते... ती नात्यांची असो, माणसांची असो किंवा स्वतःच्या स्वप्नांची... अनेकदा माणूस जेव्हा शून्यात असतो, तेव्हा त्याच्याबरोबर चालणाऱ्यांची संख्या कमी होते... त्या क्षणी दुर्लक्ष केलं जातं, प्रश्न विचारले जात नाहीत आणि साथ आपोआप मागे पडते... पण तोच काळ माणसाला खूप काही शिकवून जातो. जेव्हा आयुष्यात थोडं स्थैर्य येतं, वेगवेगळ्या गोष्टी मिळायला लागतात, तेव्हा त्याच रस्त्यावर गर्दी वाढते... तेव्हा साथ देणारे जास्त असतात, सल्ले जास्त मिळतात आणि आपल्याकडे पाहणाऱ्या नजरा बदलतात... म्हणूनच परिस्थिती बदलली की माणसांचा स्वभाव बदलतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं. या सगळ्या प्रवासात जो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत हात सोडत नाही, जो यशात उत्साहाने आणि अपयशात संयमाने सोबत चालतो, ती व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी असू शकते... कुणाच्या आयुष्यात कुटुंब असतं, कुणासाठी मित्र असतात, तर कुणासाठी प्रियकर किंवा प्रेयसी असते. नात्याचं नाव महत्त्वाचं नसतं; तर त्या नात्याने कठीण काळात दिलेली साथ महत्त्वाची असते. श्री कृष्ण सांगतात, आयुष्यात प्रत्येकजण शेवटपर्यंत सोबत चालेलच असं नाही; पण जो सोबत चालतो, त्याचं महत्त्व ओळखणं आणि योग्य वेळी योग्य निवड करणं, हेच खरं शहाणपण आहे.

मोहिनी उत्तर्डे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची