Loading ...

आरती भुवनसुंदराची - कृष्णाची आरती

आरती भुवनसुंदराची, कृष्णाची आरती - [Aarti Bhuwansundarachi, Krushnachi Aarti] आरती भुवनसुंदराची, इंदिरावरा मुकुंदाची.

आरती भुवनसुंदराची - कृष्णाची आरती | Aarti Bhuwansundarachi - Krushnachi Aarti

आरती भुवनसुंदराची, इंदिरावरा मुकुंदाची

आरती भुवनसुंदराची ।
इंदिरावरा मुकुंदाची ॥ ध्रु० ॥

पद्मसम पादयुग्मरंगा ।
ओवाळणी होति भृंगा ॥
नखमणि स्रवताहे गंगा ।
जे का त्रिविधतापभंगा ॥ चाल ॥

वर्तुळ गुल्फ भ्राजमाने ॥
किंकिणीक्वणित, नाद घणघणित, वांकिवर झुणित, नूपुरे झन्न मंजिराची ।
झनन ध्वनी मंजिराची ॥ आरती भुवन० ॥ १ ॥

पीतपट हाटकतप्तवर्णी ।
कांची नितंब सुस्थानी ॥
नाभिची अगाध ही करणी ।
विश्वजनकाची जे जननई ॥ चाल ॥

त्रिवलीललित उदरशोभा ।
कंबुगळा माळ विलंबित, झळाळ कौस्तुभ, सरळ बाहू, श्रीवत्सतरलमणि मरळ कंकणाची ।
प्रीति बहु जडित कंकणांची ॥ आरती भुवन० ॥ ॥ २ ॥

इंदुसम आस्य कुंदरदना ।
अधरारुणार्क-बिंबवदना ॥
पाहता भ्रांति पडे मदना ।
सजलमेघाब्धि दैत्यदमना ॥ चाल ॥

झळकत मकरकुंडलाभा ।
कुटिलकुंतली, मयूरपत्रावली वेष्टिली, तिलक भाळि केशरी झळाळित, कृष्णकस्तुरीची ।
अक्षता भाळि कस्तुरीची । आरती भुवन० ॥ ३ ॥

कल्पद्रुमातळी मूर्ती ।
सौदामिनी कोटिदीप्ती ॥
गोपीगोपवलय भवती ।
त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥ चाल ॥

मंजुळ मधुर मुरलिनादे ।
चकित गंधर्व, चकित अप्सरा, सुरागिरिवरा, कर्पुराधरा, रतीने प्रेमयुक्त साची ।
आरती ओवाळित साची ॥ आरती भुवन० ॥ ४ ॥

वृंदावनीचिये हरणी ।
सखे गे कृष्ण माय बहिणी ॥
श्रमलो भवाब्धिचे फिरणी ।
आता मज ठाव देई चरणी ॥ चाल ॥

अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ।
नमितो चरण शरण मी, करुणा येऊ दे विशालपाणीम कृष्ण नेणते बाळ आपुले, राखि लाज याची ।
दयानिधे राखि लाज याची । आरती भुवन० ॥ ५॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची