अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरी, अवतरले श्रीराम कौसल्येउदरी
अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरी ।अवतरले श्रीराम कौसल्येउदरी ॥
स्वानंदे निर्भर होती नरनारी ।
आरति घेउनि येती दशरथमंदीरी ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीरामा ।
आरती ओवाळू तुज पूर्णकामा ॥ ध्रु० ॥
पुष्पवृष्टी सुरवर गगनीहुनि करिती ।
दानव दुष्ट भयभीत झाले या क्षीती ॥
अप्सरा गंधर्व गायने करिती ।
त्रिभुवनी आल्हादे मंगले गाती ॥ जय० ॥ २ ॥
कर्णी कुंडल माथा मुकुट सुविराजे ।
नासिक सरळ भाळी कस्तुरी साजे ॥
विशाळ सुकपोली नेत्रद्वय जलजे ।
षट्पदरुणझुणशब्दे नभ मंडळ गाजे ॥ जय० ॥ ३ ॥
रामचंद्रा पाहता वेधलि पै वृत्ती ।
नयनोन्मीलन ढाळू विसरली पाती ॥
सुरवर किन्नर जयजयकारे गर्जती ।
कृष्णदासा अंतरी श्रीराममूर्ती ॥ जय० ॥ ४ ॥