रत्नांची कुंडले - रामचंद्राची आरती

रत्नांची कुंडले, रामचंद्राची आरती - [Ratnanchi Kundale, Ramchandrachi Aarti] रत्नांची कुंडले माला सुविराजे, झळझळ गंडस्थळ घननीळ तनु साजे.

रत्नांची कुंडले माला सुविराजे, झळझळ गंडस्थळ घननीळ तनु साजे

रत्नांची कुंडले माला सुविराजे ॥
झळझळ गंडस्थळ घननीळ तनु साजे ॥
घंटा किंकिणि अंब्र अभिनव गति साजे ॥
अंदू वांकी तोडर नूपुर ब्रिद गाजे ॥ १ ॥

जय देव जय देव रघुवर ईशा ॥
आरती निजरवर ईशा जगदीशा ॥ ध्रु० ॥

राजिवलोचन मोचन सुरवर नरनारी ॥
परात्पर अभयअक्र शंकर वरधारी ॥
भूषणमंडित उभा त्रिदशकैवारी ॥
दासा मंडण खंडण भवभय अपहारी ॥ जयदेव ० ॥ २ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.