जय देव आत्मारामा - रामचंद्राची आरती

जय देव आत्मारामा, रामचंद्राची आरती - [Jai Dev Atmarama, Ramchandrachi Aarti] जय देव जय देव जय आत्मारामा, निगमागम शोधिता न कळे गुणसीमा.

जय देव जय देव जय आत्मारामा, निगमागम शोधिता न कळे गुणसीमा

जय देव जय देव जय आत्मारामा ।
निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ॥ ध्रु० ॥

नाना देही देव एक विराजे ।
नाना नाटक लीला सुंदर रूप साजे ॥
नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे ।
अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे । जय देव० ॥ १ ॥

बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा ।
हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥
युगानुयुगी आत्मराम आमुचा ।
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥ २ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.