पक्षी - मराठी कविता

पक्षी, मराठी कविता - [Pakshi, Marathi Kavita] घेरतो चारी दिशानी अंधार जेव्हा, पापण्या मिटून आपुल्या निजतात पक्षी.

घेरतो चारी दिशानी अंधार जेव्हा, पापण्या मिटून आपुल्या निजतात पक्षी

घेरतो चारी दिशानी अंधार जेव्हा
पापण्या मिटून आपुल्या निजतात पक्षी

गुलाल ऊधळून आभाळात उगवते पहाट
सोनेरी उन्हात मग भिजतात पक्षी

येता भरून आभाळ घनगर्द सावल्यांनी
तूपासारखे पंखात मग थिजतात पक्षी

लागते आग जेव्हा मनामनांत माणसाच्या
एका खड्यात गुल्लेराच्या मग विझतात पक्षी

लागली चटक जिभेला त्या बिचाऱ्या जिवाची
पातेल्यात हॉटेलाच्या मग शिजतात पक्षी
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.