त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे - रामचंद्राची आरती

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे, रामचंद्राची आरती - [Tribhuvanmanditmal Shobhatase, Ramchandrachi Aarti] त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा, आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा.

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा, आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा ।
आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा ॥ १ ॥

श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥ ध्रु० ॥

ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण ।
मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम० ॥ २ ॥

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती ।
स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि करिती । श्रीराम० ॥ ३ ॥

रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटी ।
आरती ओवाळू चवदा भुवनांचे पोटी ॥ श्रीराम० ॥ ४ ॥

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूते ।
आरती ओवाळू पाहू सीतापतीते ॥
श्रीराम जय राम जय राम ॥ ५॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.