आत्महत्या हि एक व्यक्ती आहे असे समजून तिच्याशी मध्यरात्री साधलेला संवाद
तूझ्या अहंकाराचा कुबट वासआणि बेगडी संवेदनांची थंडगार लगट
माझ्या अंगभर सरपटत येते
तसा मी तुझ्या त्या विषारी अनुभूती पासून
स्वतःला अलगद विलग करून घेत
सोनेरी सूर्यप्रकाशात न्हालेल्या
नितळ आकाशात विरून जातो;
हे स्वप्न आहे
हे पुन्हा - पुन्हा पुटपुटत
त्या मिट्ट काळोखात हरवून जाण्यापूर्वी
तुझ्या कपाळावर गोंदण मी
भिरभिरत राहतो तुझ्या विखारी
विचारांचा निरंकारी शब्द.
शब्दांची, अर्थांची भीती ओघळत येते
हळूवार तुझ्या विषारी रसातून
त्याच्या आत बाहेर खोल - खोल पोकळीत
रांगत राहतेस, जल्लोष करत राहतेस
तळमळत्या आभासी अमृतकुंभात
जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी,
हरवून जाण्याच्या गूढ अनाकलनीय
तुझ्याच वारुळात
मी मात्र सोनेरी किरणांच्या
पायवाटेवर नितळ आकाशात विरून जातो;
हे स्वप्न आहे
हे पुन्हा - पुन्हा पुटपुटत
त्याच मिट्ट काळोखात हरवून जाण्यापूर्वी
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा