वारं उलट वाहतंय - मराठी कविता

वारं उलट वाहतंय, मराठी कविता - [Vaar Ulata Vaahtay, Marathi Kavita] वारं उलट वाहतंय रे दादा, सरकार कैद्याना सोडतंय आणि लोकांना घरात लॉकडाऊन.
वारं उलट वाहतंय - मराठी कविता | Vaar Ulata Vaahtay - Marathi Kavita

वारं उलट वाहतंय रे दादा, सरकार कैद्याना सोडतंय आणि लोकांना घरात लॉकडाऊन!

वारं उलट वाहतंय रे दादा,
सरकार कैद्याना सोडतंय
आणि लोकांना घरात लॉकडाऊन !

रास एकच आहे रे दादा,
कलियुग आणि कोरोनाची
चोरायले सोडून, संन्याशाले फाशी !!!

काही तरी बदलतंय रे दादा,
माणसं खुराड्यात कैद झाली
आणि जनावरं, पक्षी मोकाट सुटले !

जमाना बदलला कारे रे दादा,
जनावर आणि माणसाची बी
आदला बदल होईल काय की ?


गणेश तरतरे | Ganesh Tartare
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि अनुभव कथन या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.