परिक्रमा - मराठी कविता

परिक्रमा, मराठी कविता - [Parikrama, Marathi Kavita] मी जेव्हा परिक्रमा करीत असतो, तेव्हा तो परिघ त्या चक्रव्रताचा किनारा नसतो.
परिक्रमा - मराठी कविता | Parikrama - Marathi Kavita

मी जेव्हा परिक्रमा करीत असतो, तेव्हा तो परिघ त्या चक्रव्रताचा किनारा नसतो!

मी जेव्हा परिक्रमा करीत असतो,
तेव्हा तो परिघ त्या चक्रव्रताचा किनारा नसतो !
असूच शकत नाही !
मी हात दूर पसरवला की,
परिघ आणखी काही अवकाश व्यापतो,
नंतर माझी नजर विस्तीर्ण अवकाशाचा ताबा घेत जाते,
अगदी दूर दूर पर्यंत...
पलीकडे काही दिसतं का, आहे का ?
नजर चाहूल घेत असते.
तिथे काहीतरी असण्याची शास्वती आहेच...
काहीतरी भव्य, दिव्य,
शांत तरीपण चंचल,
चालक, मालक, पालक,
किंवा माझ्याच अंशाचे काहीतरी...

जाणून घेईन मी !
त्यासाठी कोणत्याही लक्ष्मणाने ओढलेली रेषा
मला अडवू शकत नाही.

त्या कक्षेबाहेरील अनंतात विहार करता येईल ?
कदाचित पूर्ण ताबा देखील मिळवता येईल !
परंतु, परिक्रमा करीत असताना
मी, बाहेर नाही, आत पाहिलं पाहिजे.
परिघाच्या बिंदूशी माझी नाळ पुन्हा जुळली की,

मला, पुज्यातून निःसंदेह कक्षेबाहेरील
ब्रह्मांडच्या कवेत शिरता येईल.


गणेश तरतरे | Ganesh Tartare
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि अनुभव कथन या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.