डोळे उघडले तर - मराठी कविता

डोळे उघडले तर, मराठी कविता - [Dole Ughadale Tar, Marathi Kavita] डोळे उघडले तर अंधारानं घेरलं होतं, काही असण्याची चाहूल लागत नव्हती.
डोळे उघडले तर - मराठी कविता | Dole Ughadale Tar - Marathi Kavita

डोळे उघडले तर अंधारानं घेरलं होतं, काही असण्याची चाहूल लागत नव्हती

डोळे उघडले तर अंधारानं घेरलं होतं,
काही असण्याची चाहूल लागत नव्हती.

चाचपडताना माझा मीच मला सापडत होतो,
रंग - रूपा शिवाय मलाच मी दिसत होतो.

मग म्हटलं, माझं मीच मला पाहून घ्यावं,
मग सगळंच दिसत गेलं, अगदी बोलपटासारखं.

माझं गावं, लहानपण, शाळा, मान-अपमान, मित्र,
गुरुजी अगदी सगळं, अगदी काल परवा पर्यंत.

अख्खा भूतकाळ एकाच वेळी बरसणार होता की काय ?
गोंधळलो, भ्यालो, सावरलो, मग ठरवलं निश्चयानं !!!

केलेल्या चुकाचा हिशोब घ्यावा भूतकाळ कडून !!!
तो ही सांगतो म्हणाला, मग म्हणाला धीर धर,

नीट ऐक, सावरून बस, तू बरोबर नव्हता कधीच !!
मी माझ्यातच पुन्हा पाहिलं, खरं होतं ते, तो म्हणतो ते !!

काही चुका दुरुस्त होण्यासारख्या होत्या,
काही त्या पलीकडच्या, मन खिन्न करणाऱ्या !!

याच जन्मात करीन काहींचं प्रायश्चित्त आणि
उरलेल्या साठी आणखी एक जन्म मागून घेईन मी,

अंधारातील दिसणं बाहेरच नाही आतलं होतं,
चाचपडताना माझा मीच मला सापडत होतो.


गणेश तरतरे | Ganesh Tartare
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि अनुभव कथन या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.