उपवासासाठी पौष्टिक रताळ्याचा शिरा

रताळ्याचा शिरा, पाककृती - [Ratalyacha Shira, Recipe] पौष्टिक सोबतच रुचकर असा महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय गोड पदार्थ म्हणजे रताळ्याचा शिरा.
उपवासासाठी पौष्टिक रताळ्याच्या शिरा
छायाचित्र: हर्षद खंदारे
उपवासात खाल्ला जाणारा पौष्टिक सोबतच अत्यंत रुचकर असणारा महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय गोड पदार्थ म्हणजे रताळ्याचा शिरा. विशेष करून रताळ्याचा शिरा हा माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला येणाऱ्या महाशिवरात्रीउपवासासाठी केला जातो.

रताळ्याचा शिरा करण्यासाठी लागणारा जिन्नस

 • पाव किलो उकडून कुस्करलेली रताळी
 • पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ
 • पाव वाटी साजुक तूप
 • कापं केलेला सुकामेवा

रताळ्याचा शिरा करण्याची पाककृती

 • सर्वप्रथम रताळी स्वच्छ धुवून घ्या.
 • कुकरमध्ये ७ - ८ शिट्या काढून मऊ शिजवून घ्या.
 • थंड झाल्यावर त्याचे साल काढून घ्या.
 • काही रताळ्यांमध्ये मोठे केस असतात ते काढून टाकावे जेणेकरून खाताना तोंडात येणार नाहीत.
 • साल काढल्यावर चांगले मऊ कुस्करून घ्यावेत. स्मॅश करून घ्यावेत.
 • आता गॅसवर भांडे ठेवून त्यात २ मोठे चमचे तूप टाकावे.
 • तूप टाकल्यावर त्यामध्ये कुस्करलेली रताळी टाकावीत. व्यवस्थित परतून घ्यावीत.
 • परतल्यावर त्यामध्ये गूळ घालावा आणि ढवळून घ्यावा.
 • रताळ्यामध्ये गूळ व्यवस्थित मिळून येइपर्यंत ढवळत रहावे.
 • मध्ये मध्ये तूप टाकून एकत्र करून घ्यावे.
 • सारखं परतून परतून घेतल्यावर शिरा मोकळा होवू लागेल.
 • भांड्याला न चिकटता वेगळा झालेला दिसून येईल.
 • थोडा वेळ शिजू दिल्यावर त्यामध्ये सुकामेवा घालून एकदा परतून घ्यावा.
 • थोडा वेळ परतल्यावर गॅस बंद करा.

...तयार आहे पौष्टिक आणि उपवासाला खाल्ला जाणारा रताळ्याचा शिरा.


रताळ्याचा शिरा (पाककृतीचा व्हिडिओ)

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

२ टिप्पण्या

 1. Delicious recipe, Thanks for publishing such a authentic real Maharashtrian recipe.
 2. मस्तच आहे ही रेसिपी.
  गुळाचा वापर केल्यामुळे फारच खमंग लागते चवीला.
  याच प्रकारच्या आणखी काही रेसिपी बघायला आवडतील.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.