या लढाईला - मराठी कविता

या लढाईला, मराठी कविता - [Ya Ladhaila, Marathi Kavita] माहित नाही कुणी हिला, दीपावली असं नाव दिलं.
या लढाईला - मराठी कविता | Ya Ladhaila - Marathi Kavita

माहित नाही कुणी हिला, दीपावली असं नाव दिलं?

माहित नाही कुणी हिला,
दीपावली असं नाव दिलं !!
तुम्हाला देखील माहित आहेच,
या लढाईला,

ही दीपावली नाही,
या घटकेला, मी दीपावली
साजरी करूच शकत नाही,
या लढाईत,

बस, विश्वास करा माझा,
बस, इतकीच विनंती आहे,
बस, इतकचं सांगणं आहे,
या लढाईत,

माझ्या भावांनो,
मी केवळ तुमच्याबरोबर आहे,
तुम्ही देखील, मला साथ दया,
या लढाईत,

विनंती आहे आपणाला,
माझ्या मनीषेला,
चुकीच नका समजू,
सावध राहा.

पूर्व पश्चिम जाणत नाही मी,
ना तर उत्तर दक्षिण,
केवळ इतके माहित आहे,
जिंकायचं आहे मला.

या कोरोनाच्या लढाईला !!!


गणेश तरतरे | Ganesh Tartare
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि अनुभव कथन या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.