सूर माळून गळ्याभोवती उषा स्वप्न ल्याली
सूर माळून गळ्याभोवतीउषा स्वप्न ल्याली
शब्द वेचुनी पक्षी पुसती
वृक्षवेलीस खुशाली
पांघरलेली पेंग झटकुनी
गगन जन्मले नवे
क्षितीजावरती रंग उधळले
केशरी हळवे
कुशीकुशीतून हात निघाले
आळस गेला चराया
रोमारोमांत जडली उषेला
उल्हासाची माया
संसाराचे जुनेच गाणे
नवपक्ष्यांच्या ओठी
चंद्र मरुनि सुर्य जन्मला
याच भूमीच्या पोटी