सूर्यास्त - मराठी कविता

सूर्यास्त, मराठी कविता - [Suryast, Marathi Kavita] तुज दिसताचं दूर जावा तिमिर, गगन सदन तुझे स्थान.
सूर्यास्त - मराठी कविता | Suryast - Marathi Kavita

तुज दिसताचं दूर जावा तिमिर, गगन सदन तुझे स्थान

तुज दिसताचं दूर जावा तिमिर, गगन सदन तुझे स्थान,
तू जाताचं धावे पुन्हा तिमिर, सर्वत्र असते तुझेचं ध्यान

तेजाकडून तिमिराकडे, खग शोधे आपुले झोपडे
संधीप्रकाश धडपडे, तुला नसे चंद्र चांदण्याचे वावडे

तुज पाहता विसरून भान, तु नसता तरं होईल कहर,
तुजविण वाटे रुक्ष जीवन, लता वेलींना येत नाही बहरं

वनराईतून अलगद निघतो, कड्याकपारीत साद घालतो,
जलशयांना जीवन देतो, सोनेरी कणांची चादर पांघरतो

उदयाचा शेवट अस्तानेच होतो, स्मरणात सदैव बांध घालतो,
आली संकटे कितीही तरी, धैर्याने मार्ग शोधायचा असतो

- श्रीरंग गोरे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.