Loading ...
/* Dont copy */

दख्खनचा राजा मालिकेत समर्थ पाटील ज्योतिबाच्या बालरुपात

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत समर्थ पाटील साकारणार ज्योतिबाचं बालरुप - [Dakkhancha Raja Jotiba Balrup by Samarth Patil].

महाराष्ट्राच्या या दैवताची गोष्ट २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता

स्टार प्रवाहवर २३ ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्र सप्तमीपासून सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दख्खनच्या राजाचा महिमा सांगणाऱ्या या पौराणिक मालिकेत ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा पाहायला मिळणार आहे. बालकलाकार समर्थ पाटील ज्योतिबाचं बालरुप साकारणार आहे.

समर्थ मुळचा कोल्हापुरातील सरवडे गावचा. ज्योतिबा हे त्याचं कुलदैवत. त्यामुळे लहानपणापासूनच ज्योतिबावर त्याची श्रद्धा आहे. याच दैवताचं बालरुप साकारायला मिळणं हा ज्योतिबाचा आशिर्वाद असल्याचं समर्थ म्हणाला. मी या भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. कोल्हापुरात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेचं शूट होणार असल्याचं मी ऐकलं होतं. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मला खूप आनंद झाला. सेटवर आम्हा सर्वांचीच काळजी घेतली जातेय. निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि सहकलाकार सर्वच जण मला या नव्या भूमिकेसाठी खूप मदत करत आहेत. घोडेस्वारी मी शिकलो आहे ज्याचा या भूमिकेसाठी मला उपयोग होईल. फावल्या वेळात मी सेटवर त्याचा सरावही करत असतो.

तेव्हा महाराष्ट्राच्या या दैवताची गोष्ट नक्की पहा २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ फक्त आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची