तिरंगा केक - पाककृती

तिरंगा केक, पाककृती - [Tiranga Cake, Recipe] शुद्ध शाकाहारी बिनअंड्याचा केक, दुध किंवा चहासोबत मधल्यावेळच्या पोट पुजेसाठी खास तिरंगा केक.
तिरंगा केक - पाककृती | Tiranga Cake - Recipe

शुद्ध शाकाहारी बिनअंड्याचा केक, दुध किंवा चहासोबत मधल्यावेळच्या पोट पुजेसाठी खास तिरंगा केक

तिरंगा केकसाठी लागणारा जिन्नस
 • १ वाटी मैदा
 • अर्धा वाटी तेल
 • अर्धा वाटी पीठीसाखर
 • अर्धा वाटी दूध
 • अर्धा चमचा व्हॅनिला इसेंस
 • चिमुटभर खायचा हिरवा रंग
 • चिमुटभर खायचा भगवा रंग
 • अर्धा चमचा बेकिंग पावडर
 • पाव चमचा खायचा सोडा

तिरंगा केकची पाककृती
 • सर्वात आधी ज्यामध्ये आपण केक बनवणार आहोत ते भांडे प्री-हीट करायला ठेवा.
 • ओव्हनमध्ये केक करणार असाल तर १० मिनीटे प्री-हीट करायला ठेवा.
 • आता केकच्या टीनला तेल लावून घ्या व त्यावर मैदा पसरून घ्या. शिल्लक मैदा काढून टाका.
 • एका बाऊलमध्ये तेल घ्या व त्यामध्ये पीठीसाखर घालून ढवळा. सर्व एकजीव होईपर्यंत ढवळा.
 • आता त्यात अर्ध दूध घालून एकजीव होईपर्यंत ढवळा. अर्ध दुध शिल्लक ठेवा.
 • आता बाऊलवर चाळणी ठेवा.
 • त्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि खायचा सोडा चाळून घ्या.
 • चाळून झाल्यावर एका चमच्याने एका दिशेत गोल गोल फिरवून ढवळत रहा.
 • ढवळत असताना मध्ये मध्ये शिल्लक राहिलेले दुध घाला व एका दिशेने ढवळत रहा.
 • व्हॅनिला इसेंस टाकून पुन्हा ढवळून घ्या.
 • वाटले तर परत थोडेसे दुध घालून ढवळा.
 • एकसारखे मिश्रण तयार झाले पाहिजे जे चमच्यातून एकसमान सरळ खाली पडेल.
 • केकचे मिश्रण तयार आहे.
 • आता आपण दोन अजून बाऊल घ्यावेत.
 • एकूण तीन बाऊल मध्ये हे मिश्रण समान वाटून घ्यावे.
 • एका बाऊलमध्ये भगवा रंग, दुसऱ्या बाऊलमध्ये हिरवा रंग टाकून ढवळून घ्या.
 • तिसरा बाऊल तसाच ठेवा. हे झाले आपले तीन कलर.
 • आता तेल लावलेल्या केकचा टीन घ्या.
 • सर्वात आधी त्यामध्ये एक चमचा हिरवा रंगाचे मिश्रण टाका. टीन थोडा टॅप करून गोल फिरवा.
 • आता त्यामध्ये एक चमचा रंग नसलेलं मिश्रण टाका. तेही वरील प्रमाणे कृती करा.
 • ते झाल्यावर आता एक चमचा भगवा रंग असलेलं मिश्रण टाकून पसरून घ्या.
 • आता परत हिरवा, रंगहीन आणि भगवा असे मिश्रण टाकत रहा.
 • सर्व रंगांचं मिश्रण वरील कृती संपेपर्यंत करत राहा.
 • मिश्रण ओतून झाल्यावर एक टूथपीक किंवा बारीक काडी घ्या.
 • मध्यभागेपासून वरपर्यंत काडीने एक रेष ओढा. असे आठ दिशेने करा.
 • आठ दिशेला झाल्यावर आता बाहेरून आतमध्ये याप्रमाणे पुन्हा दुसऱ्या दिशेला काडीने रेषा ओडाव्यात.
 • एक लक्षात ठेवा प्रत्येक रेष ओढताना काडी पुसून घ्या.
 • तुम्ही बघू शकता आता एक सुंदरशी फुलासारखी नक्षी तयार झाली आहे.
 • आता हा टीन प्री-हीट भांड्यात ठेवा. गॅस मंद ठेवा व साधारण ४० - ५० मिनीटे केक बेक करून घ्या.
 • ओव्हनमध्ये १८० डिग्री से. ला ४० - ५० मिनीटे ठेवून केक बेक करून घ्या. तुम्ही साधारण अर्धा तासानंतर मध्ये मध्ये केक बेक झाला का तपासू शकता.
 • साधारण ५० मिनीटानंतर केक तयार झाल्यावर गॅस बंद करा.
 • केकचा टीन बाहेर काढा. केक पूर्ण थंड झाल्यावर साईडच्या कडा सूरीच्या साहाय्याने सैल करून घ्या.
 • टीन उलटा करून केक काढून घ्या व त्याचे तुकडे करून खाण्यास द्या.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.