काल एक विचार असला आला मनात माझ्या
काल एक विचार असलाआला मनात माझ्या
कोणाचा वास आहे
ह्या अंतरात माझ्या?
आईमुळेच माझा
संसार हा बहरतो
बरकत तिच्याच कारण
आहे घरात माझ्या
जेव्हा कधी मी रडतो
पदरात तीच घेते
झाकून पाहते ती
बाहेरून आत माझ्या
ती दुःख माझं हरते
चिंता ती माझी करते
ती देवदूत आहे
या जीवनात माझ्या
आई स्वर्ग माझा
माझा नरक पण आई
विश्वास माझा आहे
हा व्यवहारात माझ्या
आई मुळे सुगंधी
हे शब्द माझे सारे
ती लेखणीत माझ्या
ती अक्षरात माझ्या
- हसनैन आकिब