प्रेम आणि अंतर - मराठी कविता

प्रेम आणि अंतर, मराठी कविता - [Prem Ani Antar, Marathi Kavita] असे मी ऐकले आहे, कि जेव्हा अंतर असतात, तर प्रेम रुसून जाते.
प्रेम आणि अंतर - मराठी कविता | Prem Ani Antar - Marathi Kavita

असे मी ऐकले आहे, कि जेव्हा अंतर असतात, तर प्रेम रुसून जाते

असे मी ऐकले आहे
कि जेव्हा अंतर असतात
तर प्रेम रुसून जाते
पण हेही सत्य आहे
कि प्रेम अंतरांना वाव देत नाही

प्रेमात औपचारिकता नसते येण्या जाण्याची
प्रेमात भीती नसते जमान्याची

प्रेम हा असा रोप आहे
जे काटेरी झुडुपात वाढते

पण या काट्यांचा हृदय देखील
या प्रेमाने कंपित होते

प्रेम परीक्षेच्या बोगद्यातून होऊन निघते
परीक्षेला सामोरे जाऊन प्रेमही बहरते

परंतु काही अंतर अशी असतात
जसे रेलगाडी ची दोन रूळं

जसे दोन हात व हातातली बोटे
कि जसे चेहर्‍यावर ची दोन डोळे

की ते सर्व एकत्र चालतात पण त्यांच्यात एक अंतर असते
त्यांच्यात अलगाव असते सोबतच त्यांच्यात एक सखोल संबंध पण असते
ऐका!

आता आपल्या समोर जी आपत्ती आहे
त्याच्या क्रूरतेला परीक्षाच मानू या.

जर हे अंतर आवश्यक आहेत तर असो आकिब
जगाच्या खुशीतच आपली खुशी दडली आहे
जर असे आहे तर या अंतरांची हैसियत काय?
प्रेम जर चमकत आहे तर अंतराची अहमियत काय?

- हसनैन आकिब
(मराठी भाषांतर: प्रा. सुनील ईखार, आष्टी)

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.