तोडगा करा ना - मराठी कविता

तोडगा करा ना, मराठी कविता - [Todaga Kara Na, Marathi Kavita] चोहीकडे असा हा एक लॉक डाऊन आहे, प्रत्येक माणसाच्या तोंडाला गाऊन आहे.
तोडगा करा ना - मराठी कविता | Todaga Kara Na - Marathi Kavita

चोहीकडे असा हा एक लॉक डाऊन आहे, प्रत्येक माणसाच्या तोंडाला गाऊन आहे

चोहीकडे असा हा एक लॉक डाऊन आहे
प्रत्येक माणसाच्या तोंडाला गाऊन आहे
हा वायरस कोरोना,
या राक्षसा विरोधी हा तोडगा करा ना

एप्रिल संपत आला झाडाला पिकला आंबा
पडता कशाला बाहेर आता घरीच थांबा
या राक्षसा विरोधी हा तोडगा करा ना

हे क्षण मुसिबताचे जातील खुद्द मरायला
हिंडू नका कुठेही, जाऊ नका फिरायला
या राक्षसा विरोधी हा तोडगा करा ना

रोगांच्या लक्षणांवर ठेवा नजर जरा ना
आजार हा कधीही होतो तरी बरा ना
या राक्षसा विरोधी हा तोडगा करा ना

भाऊ, बहीण, बाबा, आई नि माझ्या आबा
मामा आणि हो काका, अंतर्मनात झाका
या राक्षसा विरोधी हा तोडगा करा ना

याला पळवण्यासाठी काही तरी करा ना
थोडी सबुरी ठेवा, अन् धीर पण धरा ना
या राक्षसा विरोधी हा तोडगा करा ना

अफवा नका पसरवू सत्याचं भान ठेवा
या संकटाच्या वेळी देशाचा मान ठेवा
या राक्षसा विरोधी हा तोडगा करा ना

शब्दांत माझ्या आकिब जीवेचा रंग भरा ना
मुखड्याला सुर तुम्ही द्या गातो मी अंतरांना
या राक्षसा विरोधी काही तरी करा ना
या राक्षसा विरोधी हा तोडगा करा ना

- हसनैन आकिब

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.