अंधारल्या रात्रीत ह्या, मनामध्ये चांदण सडे, का भास होते तिचे, का जीव श्वासाविन अडे
किती झोपण्याचा प्रयत्न करूनरात्र अशीच जाते उरून
अंधारल्या रात्रीत ह्या
मनामध्ये चांदण सडे
का भास होते तिचे
का जीव श्वासाविन अडे
किरकिरणार्या किड्यापरी
मन विचारात जाते बुडून
किती झोपण्याचा प्रयत्न करून
रात्र अशीच जाते उरून
उशीला घट्ट पकडून
मग भासांचे खेळ निराळे
कधी तिचे निरागस
तर कधी माझे सुरू चाळे
तिच्या खुणांचे अस्तित्व
रात्रीनेही ठेवलंय जपून
किती झोपण्याचा प्रयत्न करून
रात्र अशीच जाते उरून
कैफ आमच्या आलिंगणाचा
अजूनही बाहूंना जाण मिठीची
अजूनही श्वासाचे मुसमुसणे
अजूनही ओलावलिये घडी ओठांची
अजूनही केव्हा जीभ वेडी
दातांमध्ये राहते अडकून
किती झोपण्याचा प्रयत्न करून
रात्र अशीच जाते उरून
ओळखीचा चंद्र
ओळखीचे झालेत तारे
ओळखीचा शुक्र
ओळखीचे झालेय वारे
जाता जाता तेही कधी
आमची प्रीत पाहतात लपून
किती झोपण्याचा प्रयत्न करून
रात्र अशीच जाते उरून
पापण्यात नरम जलाचे
थेंब तिचे आहेत साचून
तिच्या माझ्या जीवनाची
खूप पाने आहे मी वाचून
प्रत्येक पान उलघडताना
प्रत्येक रात्र जाईल छळून
किती झोपण्याचा प्रयत्न करून
रात्र अशीच जाते उरून