Loading ...
/* Dont copy */

आत्महत्येशी शेवटचा संवाद - मराठी कविता (हर्षद खंदारे)

मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक, लेखक आणि कवी हर्षद खंदारे यांची आत्महत्येशी शेवटचा संवाद ही मराठी कविता.

आत्महत्येशी शेवटचा संवाद - मराठी कविता (हर्षद खंदारे)

विषारी अनुभव आणि अहंकाराच्या वारुळातून मुक्त होऊन आत्म्याच्या शांती आणि प्रकाशाचा शोध घेण्याची भावनात्मक यात्रा दर्शविणारी कविता..

आत्महत्येशी शेवटचा संवाद

हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक, मराठीमाती डॉट कॉम)

ही कविता मन आणि अनुभवांच्या विरोधाभासी प्रवाहाचे गूढ भावचित्रण करते. कवितेत व्यक्तीच्या अनुभवातील विषारी, बेगडी भावनांचा अहंकार आणि त्यातून निर्माण होणारी तीव्र अस्वस्थता स्पष्ट आहे. मात्र, त्याच विरोधाभासात कवी स्वतःला नितळ आकाश, सोनेरी सूर्यप्रकाशात विलीन करताना, शांती आणि मुक्तीचा अनुभव घेतो. शब्द, अर्थ, गूढ आणि काळोख यांचा प्रवाह हा मनाच्या जटिलतेचे प्रतीक आहे. पुन्हा–पुन्हा येणारे स्वप्न म्हणजे आतून बाहेर पडण्याची, हरवून जाण्यापूर्वीच्या क्षणाची अंतर्मुख अनुभूती आहे. कविता व्यक्त करते की जिवंत राहण्यासाठी आणि स्वतःला शोधण्यासाठी प्रत्येकाला विषारी भावनांच्या वारुळातून बाहेर पडणे आवश्यक असते आणि त्या प्रक्रियेत मुक्ती, प्रकाश आणि स्वप्नही समोर येते.

तूझ्या अहंकाराचा कुबट वास आणि बेगडी संवेदनांची थंडगार लगट माझ्या अंगभर सरपटत येते तसा मी तुझ्या त्या विषारी अनुभूती पासून स्वतःला अलगद विलग करून घेत सोनेरी सूर्यप्रकाशात न्हालेल्या नितळ आकाशात विरून जातो; हे स्वप्न आहे हे पुन्हा - पुन्हा पुटपुटत त्या मिट्ट काळोखात हरवून जाण्यापूर्वी तुझ्या कपाळावर गोंदण मी भिरभिरत राहतो तुझ्या विखारी विचारांचा निरंकारी शब्द. शब्दांची, अर्थांची भीती ओघळत येते हळूवार तुझ्या विषारी रसातून त्याच्या आत बाहेर खोल - खोल पोकळीत रांगत राहतेस, जल्लोष करत राहतेस तळमळत्या आभासी अमृतकुंभात जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी, हरवून जाण्याच्या गूढ अनाकलनीय तुझ्याच वारुळात मी मात्र सोनेरी किरणांच्या पायवाटेवर नितळ आकाशात विरून जातो; हे स्वप्न आहे हे पुन्हा - पुन्हा पुटपुटत त्याच मिट्ट काळोखात हरवून जाण्यापूर्वी आत्महत्येशी शेवटचा संवाद

हर्षद खंदारे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. अनुराधा विजय०१ नोव्हेंबर, २०२०

    शब्दांचा खोलवा वाखाणण्याजोगा आहे. कवितेचा मास्टरपीस आहे हा असं म्हंटल्यास वावगं नाही ठरणार. आपल्या पुढील अशाच काही वेगळ्या धाटणीच्या कविता वाचायला नक्कीच आवडतील.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अनुराधा विजय,

      आपल्या सारख्या दर्जेदार आणि सुज्ञ वाचकांचे अभिप्राय आम्हाला अधिकाधिक उत्तम साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करतात.

      धन्यवाद!

      हटवा
  2. हर्षद दादा तुमच्या लिखनाची शैली अंगावर शहारा आणणारी आहे आणि जसजसे तुमच्या कवितेतल्या शब्दांचे अर्थ उलगडत जातात तसतसे शहारलेल्या अंगावर काटा येऊ लागतो.

    अत्यंत विलक्षण रचना आहे आपली.

    तुमच्या सर्वच कविता कुठे वाचायला मिळतील? आपला काव्य संग्रह प्रकाशित झाला असल्यास कृपया सांगावे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हर्षद खंदारे यांची रचना आपणांस आवडली यात आम्हाला आनंदच आहे.

      हर्षद खंदारे हे मराठीमाती डॉट कॉम चे मुख्य संपादक असुन त्यांचे सर्व साहित्य मराठीमाती डॉट कॉम येथे नियमित प्रकाशित होत असते.

      हर्षद खंदारे यांचे सर्व लेखन येथे आपण येथे पाहू शकता: हर्षद खंदारे

      हटवा
  3. सुधा अभिजित०२ डिसेंबर, २०२०

    तुझी ‘मनाच्या खोल दरीत’ हि कविता वाचल्याचं आठवतंय त्या नंतर आज वाचलेली तुझी हि कविता...

    शब्दांत जितकी आर्तता आहे ओलावा आहे तेव्हढीच धार आणि न गवसता येणारा खोलवा आहे.

    लिहिनं थांबवू नकोस.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सुधा अभिजित,

      मनाच्या खोल दरीत ही नक्कीच हर्षद ची नक्कीच एक अप्रतिम कविता / रचना आहे.

      आपला अभिप्राय आमच्यासाठी अगदी मौल्यवान आहे.

      मनःपूर्वक धन्यवाद!

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची