Loading ...

जय देवी गंगाबाई - गंगेची आरती

जय देवी गंगाबाई, गंगेची आरती - जय देवी जय देवी जय गंगाबाई, पावन करि मन सत्वर विश्वाचे आई [Jai Devi Gangabai, Gangechi Aarti].

जय देवी गंगाबाई - गंगेची आरती | Jai Devi Gangabai - Gangechi Aarti

जय देवी गंगाबाई - गंगेची आरती

आरत्या

जय देवी जय देवी जय गंगाबाई । पावन करि मन सत्वर विश्वाचे आई ॥ जय देवी जय देवी जय गंगाबाई । पावन करि मन सत्वर विश्वाचे आई ॥ ध्रु० ॥ माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरसी । हरिसी पातक अवघे जग पावन करिसी ॥ दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी । हरहर आता स्मरतो गति होईल कैसी ॥ जय देवी० ॥ १ ॥ पडले प्रसंग तैशी कर्मे आचरलो । विषयांचे मोहाने त्यातचि रत झालो ॥ ज्याचे योगे दुष्कृत-सिंधुत बुडालो । त्यातुनि मजला तारिसि ह्या हेतूने आलो । जय देवी० ॥ २ ॥ निर्दय यमदूत नेती त्या समयी राखी । क्षाळी यमधर्माच्या खात्यातील बाकी ॥ मत्संगतिजन अवघे तारियले त्वा की । उरलो पाहे एकचि मी पतितांपैकी ॥ जय देवी० ॥ ३ ॥ अघहरणे जय करुणे विनवितसे भावे । नोपेक्षी मज आता त्वत्पात्री घ्यावेम ॥ केला पदर पुढे मी, मज इतुके द्यावे । जीवे त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावे । जय देवी० ॥ ४ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची