Loading ...

पाहुणा गोजिरा - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची पाहुणा गोजिरा ही लोकप्रिय मराठी कविता.

पाहुणा गोजिरा - मराठी कविता (वसंत बापट)

आज ये अंगणा, पाहुणा गोजिरा


पाहुणा गोजिरा - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची पाहुणा गोजिरा ही लोकप्रिय मराठी कविता.



आज ये अंगणा,
पाहुणा गोजिरा

ये घरा आमुच्या, सोयरा साजिरा॥

वाजवा नौबती,
ये सखा सोबती

खेळवा संगती, हा जरा लाजरा॥

कोवळे देहुडे,
सावळे रूपडे

पोपटी अंगडे, शोभते सुंदरा॥

हा वसंतासवे,
सृष्टीला हासवे

पालवे, बोलवे, सानुल्या पाखरा॥

श्रावणी न्हातसे,
आश्विनी गातसे

साउली देतसे, भूमिच्या लेकरा॥

बासरी ऐकतो,
चांदणे झोकतो

नाचतो, डोलतो, झोंबतो अंबरा॥

अंगारेखांतुनी,
पर्णशाखांतुनी

वाहतो जीवनी, अमृताचा झरा॥

गीत गाता मुखी,
नाचवा पालखी

विश्व व्हाया सुखी, या नव्या जागरा॥

सूर्य देवो, द्धुती
चंद्र देवो द्रुती

छत्रछायाकृती, मित्र आला घरा॥

- वसंत बापट

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची