Loading ...

समर्थ रामदास स्वामी - मातीतले कोहिनूर

समर्थ रामदास स्वामी, मातीतले कोहिनूर - [Samartha Samdas Swami, People] रामदासाचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानश्या गावचा. मूळचे नाव नारायण सूर्याजी ठोसर.

समर्थ रामदास स्वामी - मातीतले कोहिनूर | Samartha Samdas Swami - People

समर्थ रामदास स्वामी - (एप्रिल १६०८ - २ फेबुवारी १६८१)



रामदासाचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानश्या गावचा. मूळचे नाव नारायण सूर्याजी ठोसर. सिद्धपुरुष म्हणून लोक ‘समर्थ रामदास’ म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात राम, हनुमान ह्यांची मंदिरे काढली. राजकारण, धर्मकारण जाणीवपुर्वक अंतर्भुत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होय. करुणाष्टके, मनाचे श्लोक, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही त्यांची महाराष्ट्रात घरोघरी म्हटली जाणारी गणपतीची आरती.

दासबोधाचे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वतः अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या (आजही मार्गदर्शक ठरणाऱ्या) समर्थांनी शके १५७१ च्या वैशाखात समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजी महाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला.

समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची