Loading ...

मनाचे श्लोक ५

मनाचे श्लोक ५ - [Manache Shlok 5] समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक ५, मना पापसंकल्प सोडूनि द्यावा, मना सत्यसंकल्प जीवीं धरावा.

मनाचे श्लोक ५ | Manache Shlok 5

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ५, मना पापसंकल्प सोडूनि द्यावा, मना सत्यसंकल्प जीवीं धरावा

मनाचे श्लोक ५


मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥ ५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः पापकर्मादरस्त्याज्य एव
मनः सत्यसंकल्प एवानुसेव्यः ।
मनः कल्पनां मुञ्च शब्दादिकानां
विकाराश्रयेणेह धिग् धिक्त्वमेति ॥ ५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ५ - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ‘कोहं’ हा मिथ्या मायेचा विकल्प. किंवा द्वैत कल्पी अशी अशुद्ध, शबल कल्पना. पापसंकल्प म्हणजे निशिद्ध कर्म करायला लावणारी बुद्धी. अशी बुद्धी मानवाला नेहमी अधोगतीलाच नेते. मानवाची अधोगती टाळण्यासाठी समर्थ मनाला हा पापसंकल्प सोडून द्यायला सांगत आहेत.

‘सोहं’ हा सत्य ब्रह्माचा संकल्प. किंवा अद्वैत कल्पी ती शुद्ध कल्पना. सत्य म्हणजे शुद्ध. सत्यसंकल्प म्हणजे शुद्धबुद्धी किंवा सद्बुद्धी. शुद्धबुद्धी ठेवून प्रत्येक कर्म केल्यास अंतःकरण सदैव पवित्र रहातं. पवित्र अंतःकरणाने माणूस हा नेहमी आनंदी आणि समाधानी राहतो. म्हणून समर्थ मनाला सत्यसंकल्प धरुन योग्य मार्गाने जायला सांगत आहेत.

नाना विकार करिजे ।
ते कल्पना जाणावी ॥

आणि त्यातल्या त्यात विषयांची कल्पना तर, हे मना करुच नको.

जयास वाटे सीण व्हावा ।
तेणें विषयो चिंतीत जावा ।
विषयो न मिळतां जीवा ।
तगबग सुटे ॥

सांडून राम आनंदघन ।
ज्याचे मनीं विषयचिंतन ।
त्यासी कैंचें समाधान ।
लोलंगतासी ॥

विषयवासनेने मन विकारी होऊन जगात फजिती होते.

यतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते ।
संगात्संजायते कामः
कामात्क्रोधोऽभिजायते ।
क्रोधाद्भवतिसंमोहः संमोहात्स्मृति विभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो
बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ भ. गीता.


मनाचे श्लोक ५ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची