समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ६, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी
मनाचे श्लोक - श्लोक ६नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥
- समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक - श्लोक ६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)
मनो मास्तु ते क्लेशद: क्रोधलेशो ।
मनो मास्तु कामो विकारस्य मूलम् ॥
मनो नो मदं दुष्टमंगीकुरु त्वम् ।
मनो मास्तु ते मत्सरो मा च दंभ: ॥६॥
मनाचे श्लोक - श्लोक ६ - अर्थ
क्रोध हा खेद संपादी । जेथें तेथें चहुंकडे । विवेक पाहतां कैचा । शुधी तेथें असेचिना ॥
या कामाच्या योगाने, रुपहानी शक्तिहानी । द्रव्यहानी परोपरीं । याती हानी कुळहानी । सर्व हानीच होत असे ॥
भारी, मोठा, षड्रिपूंत दंभ हा मोठा शत्रु आहे. श्रीसमर्थांनी वर्णिलेल्या षड्रिपूंपैकी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ या पाचांचाच उल्लेख या श्लोकात आहे. श्रीसमर्थांचे “षड्रिपू” प्रकरण प्रत्येकाने आत्मशुद्धीचा हेतु धरुन एकवार तरी वाचावे.