Loading ...

मनाचे श्लोक २

मनाचे श्लोक २ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक २. मना सज्जना भक्तिपंथेचि जावें, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें [Manache Shlok 2].

मनाचे श्लोक २ | Manache Shlok 2

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २, मना सज्जना भक्तिपंथेचि जावें, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें...

मनाचे श्लोक २

समर्थ रामदास (समर्थ रामदास स्वामी, मनाचे श्लोक)

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥

मनोबोध २

मनाचे श्लोक २ चे संस्कृत रुपांतर

मनो रामभक्तेः पथा यास्यसि त्वं तदा श्रीहरिं प्राप्स्यसे तं स्वभावात् । जनैर्निन्दितं यत् त्वया तन्न कार्यं नरैः श्लाघितं कर्म यत्नेन सेव्यम् ॥२॥

अर्थ

मनाचे श्लोक २ चा अर्थ

हे मनाचे विशेषण आहे. मन जात्या चंचल आहे; त्याला गोड शब्दांनी आळवूनच भक्तिमार्गाकडे लावलं पाहिजे. श्रीसमर्थांची शिकवण आहेच की,

दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्त्व देऊनी ।

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पाद - सेवनं अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्मनिवेदनम् ॥ असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत.

त्यांत नवमी भक्ती आत्मनिवेदन । न होतां न चुके जन्ममरण । हें वचन सत्य प्रमाण । अन्यथा नव्हे ॥

हे सर्व प्रकार समजण्यासाठी श्रीदासबोधाचे नित्य श्रवणमनन केले पाहिजे. सहज, तत्काळ. नवविध भक्तीमध्ये श्रेष्ठ जी आत्मनिवेदन भक्ति ती घडली म्हणजे तत्काळ श्रीरामाचा साक्षात्कार होतो.

आपणांस निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती । तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो ॥

सर्व लोकांची चांगल्या वाईटाविषयी एकवाक्यता असते असे नाही. जी गोष्ट काहींना चांगली वाटते, तीच गोष्ट काहींना वाईटही वाटू शकते. तेव्हा जन म्हणजे लोक असा सामान्य अर्थ न घेता जनी जनार्दन अशी ज्यांची वृत्ती झालेली असते ते सर्व जन घ्यावे. असे जन म्हणजे सज्जन, साधुजन होत. सज्जनांची मात्र सत् आणि असत् यांच्याविषयी एकवाक्यता असते. साधुजनांच्या मार्गाने जावे असा भावार्थ.




सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची