Loading ...

मनाचे श्लोक १०

मनाचे श्लोक - श्लोक १० - [Manache Shlok - Shlok 10] सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी, सुखाची स्वयें सांडि जीवी करावी.

मनाचे श्लोक १० | Manache Shlok 10

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १०, सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी, सुखाची स्वयें सांडि जीवी करावी

मनाचे श्लोक १०


सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी ।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी ॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥ १० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १० - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो रामचन्द्रे सदा प्रीतिरस्तु
बलाद् हृद्गतं दुःखजालं निवार्यम् ।
त्वया देहदुःखं सुखत्वेन मान्यं
रमस्त्वात्मरूपे विचारेण नित्यम् ॥ १० ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १० - अर्थ


येथे श्रीसमर्थांना असं सांगायचं आहे की, श्रीरामाचे इतके अखंड स्मरण करावे, त्याच्यावर इतके प्रेम करावे की ते स्मरण कालांतराने ‘आपोआप’ होऊन भोगत असलेल्या सर्व दुःखांचा आपल्याला पूर्ण विसरच पडला पाहिजे. सदा सर्वदा श्रीरामाच्याच स्मरणात आपण लीन राहिले पाहिजे.

सांडून आपली संसारवेथा ।
करित जावी देवाची चिंता ।
निरुपण कीर्तन कथा वार्ता ।
देवाच्या चि सांगाव्या ॥
देवाच्या सख्यत्वासाठीं ।
पडाव्या जिवलगांसी तुटी ।
सर्व अर्पावें सेवटीं ।
प्राण तोहि वेचावा ॥
आपुलें आवघें चि जावें ।
परी देवासीं सख्य राहावें ।
ऐसी प्रीति जिवें भावें ।
भगवंती लागावी ॥

श्रीरामाच्या स्मरणात लीन राहता राहता आपल्याला दुःखाचा विसरच पडला पाहिजे पण इतकेच नव्हे तर, त्या दुःखातच आपल्याला सुख मानता आले पाहिजे. असे म्हणतात की देहावर कष्टे, संकटे आली की देव आठवतो. तेव्हा ही संकटे, संकटे न वाटून ईश्वरस्मरण करण्यासाठी आलेल्या सुवर्णसंधीच समजाव्या. कारण सुख भोगत असताना कोण कुठला ईश्वर, अशी आपली धारणा बनलेली असते. तर दुःखातच सुख कसे मानावे ? तर, जे काही कष्ट, हाल अपेष्टा या देहावर आलेल्या आहेत, त्यातच आपले पूर्ण कल्याण आहे असा सकारात्मक विचार नेहमी केल्यास दुःखाचे विस्मरण लगेच होईल. महाभारतात कुंतीने भगवान श्रीकृष्णांकडे हाच वर मागितला होता. त्या म्हणाल्या की, ‘हे भगवंत, मला आपण नेहमी दुःखातच ठेवा. तसे झाल्यास मला आपले स्मरण अखंडपणे होईल’. “आपदः सन्तु नः शश्वत्” हा कुंतीने मागितलेला वर सर्वश्रूतच आहे.

चंदन झिजतो खरा, पण तो झिजतो तेव्हाच त्याचा सुगंध येतो. मी न झिजता लोकांनी माझा सुगंध घ्यावा, असे जर चंदन म्हणेल तर ते अयोग्यच ठरेल. तद्वत् हे मना, साधुसंतांच्या अंतःकरणाला जर तुला रिझवावयाचे असेल, तर तुला ही चंदना प्रमाणे झिजले पाहिजे. हे मना, तू झिज, पण सत्पुरुषांचा संतोष संपादन केल्यावाचून राहू नकोस.

प्रत्येक ठिकाणी समर्थांनी त्यांच्या सर्व साहित्यांमध्ये ‘विवेकबुद्धी’ जागृत ठेवून कसे जगावे, हे दर्शवून त्याला अत्यंत महत्त्व दिले आहे. आपले खरे स्वरुप म्हणजे हा नश्वर देह नसून, निर्मळ चैतन्य हेच आहे. चैतन्य म्हणजे देहात ‘आपोआप’ चालत असलेला श्वासोच्छवास. तो प्राणरुप श्वासोच्छवास म्हणजेच राम, तोच आत्मा, तोच जगदात्मा, तोच परमात्मा आणि तेच निर्गुण ब्रह्म! त्याला आपल्या भक्तिप्रमाणे नाव कोणतेही द्या. पण त्यालाच समर्थांनी ‘सस्वरुपीं’ म्हटले आहे. जो पर्यंत आपण आपल्या सस्वरुपात लीन राहण्याचा प्रयत्न करत नाही, तो पर्यंत विवेक जागृती कधीही होत नाही. सस्वरुप हाच ईश्वर असल्याने त्याच्यात लीन राहताना, काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणही तोच देतो. या विचाराच्या योगाने -

याचि जन्में येणेंचि काळ ।
संसारी होईजे निराळें ।
मोक्ष पाविजे निश्चळें ।
स्वरुपाकारें ॥

सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप ।
सस्वरुप म्हणिजे आपलें रुप ।
आपलें रुप म्हणिजे अरुप ।
तत्व निर्शनाउपरी ॥

त्या स्वरुपाच्या ठिकाणी समर्थ म्हणतात -

शिष्या येकांती बैसावें ।
स्वरुपीं विश्रांतीस जावें ।
तेणें गुणें दृढावे ।
परमार्थ हा ॥


मनाचे श्लोक १० (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची