Loading ...

मनाचे श्लोक ९

मनाचे श्लोक ९ - [Manache Shlok - Shlok 9] नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे, अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे.

मनाचे श्लोक ९ | Manache Shlok 9

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ९, नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे, अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे

मनाचे श्लोक ९


नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥ ९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः पारकीयं वनं मा चिनु त्वम्
अतिस्वार्थधीः शिष्यतेऽत्रातिपापा ।
सदा पापजन्यं फलं भोग्यमेव
यदा नेप्सिताऽऽप्तिस्तदा दुःखमेव ॥ ९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ९ - अर्थ


इथे समर्थ मनाला शिकवण देत आहेत की हे मना, वाड-वडिलांनी अती कष्टाने मिळवलेली संपत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्याचा विचारही करु नकोस. त्यापेक्षा स्वतःच्या बळावर व स्वतःच्या पुरुषार्थाने संपत्ती मिळवून जर उदरनिर्वाह चालवला, तर जीवन सार्थकी ठरते.

स्वार्थ म्हणजे स्वतःसाठीच सर्व काही करणे, मिळवणे. मनाला मुळातच परमार्थाची आवड नसल्याने ते बाह्य जगतात सतत भटकत असते. मुळे दिसेल त्या गोष्टीस ते चिकटून त्याची आसक्ती निर्माण करते. आणि एकदा का एखाद्या गोष्टीची आसक्ती निर्माण झाली की, मन सतत त्याच्याच चिंतनात मग्न राहते आणि अजून-अजून मिळत रहावं असं सारखं वाटत राहतं. या वाटण्यामुळे मन मनुष्याला वाम मार्गावरुनही जाण्यास प्रवृत्त करते. तीच ही पापबुद्धी. त्यामुळे मनाची सगळी शक्ती ‘बाहेर’ प्रवाहित होते. वाईट विचार तर मनात सारखे चालूच असतात.

चांगले विचार मात्र विशेष शक्तीची गरज पडते. स्वार्थाचा एक साधा विचार सुद्धा माणसाला वाईट कर्मे करायला भाग पाडतो. आणि जितकी वाईट कर्मे, तितकी किंवा त्याहीपेक्षा जास्त चित्तामध्ये मलिनता. मग कधी आणि कसे होणार रामचिंतन/आत्मचिंतन? रामचिंतन जर घडलेच नाही तर शेवटी माणसाची ‘जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला’ अशी अवस्था होते. स्वार्थबुद्धी परमार्थ करायला लावत नाही आणि चालू असलेला परमार्थ बिघडवते. म्हणून समर्थ मनाला ही स्वार्थबुद्धी त्यागायला सांगत आहेत की जेणेकरुन पापाचा संचय वाढणार नाही आणि पर्यायाने रामचिंतन घडून एक दिवस शुद्ध पुण्य उदयास येऊन जीवन कृतकृत्य होईल.

जसे कर्म तसे फळ, हा निसर्गाचा नियमच आहे. आजतागायत तो कोणीही टाळू शकलेला नाही. स्वार्थ म्हणजे नकारात्मक ‘स्व’ आणि जिकडे हा ‘स्व’ आला, तिकडे पापकर्मे घडणारच. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी त्याबद्दल फार छान सांगितलं आहे. ते म्हणतात -

यतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते ।
संगात्संजायते कामः
मात्क्रोधोऽभिजायते ।
क्रोधाद्भवतिसंमोहः संमोहात्स्मृति विभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो
बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥

या श्लोकाचा अर्थ -

विषयांचं चिंतन घडत असल्यावर त्यांच्या प्रती सूप्त असलेली आसक्ती जागृत होते. आसक्ती जागृत झाल्यावर मनात काम निर्माण होतो. काम निर्माण झाल्यावर तो समुद्राच्या लाटांसारखा उफाळून वर येतो. कामाची तृप्तता जर झाली नाही तर क्रोध निर्माण होतो. क्रोध निर्माण झाल्यावर स्मृतीभ्रंश होतो आणि त्यामुळे बुद्धी भ्रष्ट होऊन मानवाचा नाश होतो.

ज्या कर्मांमुळे बुद्धीचा नाश होऊन पापसंचय वाढतो, त्या कर्मांत सत्यता म्हणजे शुद्धता कशी असणार? म्हणजे अशा प्रकारची सर्व कर्मे ही खोटीच समजावी.


मनाचे श्लोक ९ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची