Loading ...

मनाचे श्लोक ४

मनाचे श्लोक ४ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक ४, मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे [Manache Shlok 4].

मनाचे श्लोक ४ | Manache Shlok 4

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ४, मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे...

मनाचे श्लोक ४

समर्थ रामदास (समर्थ रामदास स्वामी, मनाचे श्लोक)

मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥ मना सर्वथा नीति सोडूं नको हो । मना अंतरीं सार वीचार राहो ॥ ४ ॥

मनोबोध ४

मनाचे श्लोक ४ चे संस्कृत रुपांतर

मनो वासनां दुःखदां संत्यजाशु मनः सर्वदा पापबुद्धिं जहीहि । मनो मा त्यजाऽज्ञानतो धर्ममार्गं मनस्तिष्ठ सत्सारभूते विचारे ॥ ४ ॥

अर्थ

मनाचे श्लोक ४ चा अर्थ

श्रीसमर्थ मनाला उपदेश करत आहेत की वासना कुठलीही असो, ती दुष्टच असते. वासना आपल्याला सुरुवातीला सुखाची आशा दाखवते पण अंती दुःखच भोगायला लावते. त्यामुळे ती कुठल्याही कामाची नाही. म्हणून समर्थ मनाला वासनेपासून सावध रहायला सांगत आहेत.

पाप म्हणजे कूकर्म. कूकर्म हे नेहमी माणसाच्या अधःपतनाला कारणीभूत ठरते. म्हणून समर्थ मनाला ती मूळ पापबुद्धीच नष्ट करायाला सांगत आहेत.

इथे समर्थांना एरवीचे धर्म अभिप्रेत नसून ‘धर्माचरण’ म्हणजे योग्य कर्मांचे आचरण म्हणजेच नीतिचे आचरण अपेक्षित आहे. शुद्ध आचरणाने मनातील सत्त्व वाढीस लागून भक्तीला ती सहाय्यभूत ठरते.

समर्थ मनाला उपदेश करत आहेत की अंतरमनात सदैव विवेक बुद्धीची ज्योत जागृत ठेवून जीवन जगले पाहिजे. कारण परमार्थात प्रगती करण्यासाठी आणि प्रपंच नीट चालण्यासाठी विवेकाचीच गरज लागते.




सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची