Loading ...

मनाचे श्लोक १६

मनाचे श्लोक - श्लोक १६ - [Manache Shlok - Shlok 16] मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे.

मनाचे श्लोक - श्लोक १६ | Manache Shlok - Shlok 16

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १६, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे

मनाचे श्लोक - श्लोक १६


मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मृतं बन्धुमालोक्य शोचत्यपार्थः
क्षणात् सोऽपि मृत्योः पथा सम्प्रयाति ।
यतोऽज्ञस्य नो याति लोभः प्रशान्तिं
ततोऽसौ पुनर्देहयोगं प्रयाति ॥ १६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १६ - अर्थ


श्रीसमर्थांचा इथे मनाला उपदेश आहे की -

पहातों जनाला किती येक जाती ।
तनू टाकिताहे पुढें ते पहाती ।
गताच्या कथा काढितों अल्प कांही ।
पुढें लोक ते काढिती आमुच्या ही ॥

माणसाच्या मनात ठसलेला लोभ कधीही पूर्ण होत नाही, म्हणून उद्वेग प्राप्त होतो आणि त्यायोगे जीव पुन्हः जन्माला येतो. लोभ म्हणजे सदैव अतृप्त राहणारी गोष्ट होय, जी कधीच तृप्त होत नाही. त्यामुळे वासना पूर्ण करुन मग कधीतरी परमार्थ करु, अशा वेडेपणाच्या आशेवर माणसाने कधीही राहू नये. लोभाचा स्वभाव हा नेहमी अतृप्त राहण्याचाच आहे.

मग तो कसा पूर्ण होणार ? मनाला अनेक गोष्टींचा लोभ असल्यामुळे परिणामी आपला स्वभाव देखील रागीट बनत जातो. कारण लोभाने क्षोभ म्हणजे मानसिक अशांतता निर्माण होते. क्षोभाने मन आणखीनच खचते.

म्हणून समर्थ मनला दुःखाचे मुळ असलेल्या लोभाला नष्ट करायला सांगत आहेत.


मनाचे श्लोक १६ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची