Loading ...

मनाचे श्लोक १५

मनाचे श्लोक - श्लोक १५ - [Manache Shlok - Shlok 15] मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्वही जीव मी मी.

मनाचे श्लोक - श्लोक १५ | Manache Shlok - Shlok 15

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १५, मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्वही जीव मी मी

मनाचे श्लोक - श्लोक १५


मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जिता बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनः पश्य ये संस्थिता मृत्युभूमौ
वदन्त्यामृतिं तेऽहमेवाहमित्थम् ।
चिरं जीवितं मानयन्त्यात्मनोऽज्ञाः
क्षणात् ते परित्यज्य सर्वं प्रयान्ति ॥ १५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १५ - अर्थ


जिवंतपणी देहबुद्धिच्या ओझ्याखाली राहून जो तो मीपणाचा गर्वच फार करत असतो. याबाबतीत श्रीसमर्थ म्हणतात -

जो जन्मासी येऊन गेला ।
तो मी थोर म्हणतां च मेला ॥

वास्तविक पाहता आपल्याकडे असं काय आहे की ज्याचा आपण अभिमान बाळगावा?

थोडे जिणें अर्धपुडी काया ।
गर्व करिती रडाया ।
शरीर आवघें पडाया ।
वेळ नाहीं ॥

समर्थांची ही ओवी फारच छान आहे. ते म्हणतात -

येथील येथें अवघें चि राहातें ।
ऐसें प्रत्ययास येतें ।
कोण काय घेऊन जातें ।
सांगाना कां ॥

असं असून देखील सर्वांचा व्यवहार कसा चालला आहे तो पहा! आपण सर्व मृत्युंजय असल्यासारखेच जगत आहोत.

जिता तों किती घालमेली करावी ।
बहूतांपरी कल्पना ते धरावी ।
कितीयेक तें आपुलें तें परावें ।
जनीं सर्व सांडूनि सेखीं मरावें ॥


मनाचे श्लोक १५ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची