Loading ...

मनाचे श्लोक १४

मनाचे श्लोक १४ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक १४. जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला, परी शेवटी काळमूखी निमाला [Manache Shlok 14].

मनाचे श्लोक १४ | Manache Shlok 14

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १४, जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला, परी शेवटी काळमूखी निमाला

मनाचे श्लोक १४


जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १४ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो देह एषोऽतिपुण्येन लब्धः
कृतान्तेन नीतः स एवान्तकाले ।
महान्तोऽपि वै मृत्युमार्गेण याता
असंख्येय-जीवा जनिं प्राप्य नष्टाः ॥ १४ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १४ - अर्थ


श्रीसमर्थांनी या विषयी श्रीदासबोधात तिसऱ्या दशकाच्या नवव्या समासात सांगितलंय की -

असो ऐसे सकळही गेले ।
परंतु येक चि राहिले ।
शब्दमूळ वाग्देवता । माहं माया ॥
जे स्वरूपाकार जाले ।
आत्मज्ञानी ॥

समर्थ येथे उपदेश करत आहेत की, जन्मलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस जायचंच आहे. निसर्गाचा हा नियम थोर संत-महात्म्यांनाही आजवर चुकलेला नाही. फरक फक्त इतकाच आहे की ते देहात असूनही मुक्त असल्यामुळे त्यांचा देह राहिला काय किंवा पडला काय, त्यांना त्याचे भान नसते. सामान्य जीवाला मात्र देहबुद्धिमुळे त्या वेळेस फार यातना भोगाव्या लागतात.

तेव्हा, काळ हे सत्य मानून स्वतःच्या आणि भोवतालच्या ऐहिक सुखाला न भुलता, वेळ वाया न घालवता, प्रत्येकाने तत्काळ आत्महिताचा मार्ग धरावा, असे समर्थ बजावत आहेत.


मनाचे श्लोक १४ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
अभिव्यक्ती · विचारधन · तुकाराम गाथा · संत तुकाराम · अभंग · मराठी सुविचार · मराठी कोट्स · मनाचे श्लोक · समर्थ रामदास

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची