तांदळाच्या शेवया - पाककृती

तांदळाच्या शेवया, पाककला - [Tandalachya Shevaya, Recipe].
तांदळाच्या शेवया - पाककृती | Tandalachya Shevaya - Recipe

तांदळाच्या शेवया


तांदळाच्या शेवयातांदळाच्या शेवया करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • २ वाट्या तांदळाचे पीठ
 • २ वाट्या पाणी
 • १ चमचा लोणी
 • अर्धा चमचा मीठ
 • १ नारळाचे दूध
 • चवीपुरती साखर
 • ३ - ४ वेलदोड्याची पूड

तांदळाच्या शेवया करण्याची पाककृती


 • तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे.
 • नंतर दळून आणावे.
 • ह्या पिठातील २ वाट्या पीठ घ्यावे.
 • एका पातेल्यात २ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे.
 • त्यात लोणी व मीठ घाला.
 • पाण्याला उकळी आली की त्यात २ वाट्या तांदळाचे पीठ घालून, उलथन्याच्या टोकाने ढवळा.
 • नंतर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
 • २ - ३ वाफ आल्या की उतरवावे.
 • नंतर ही उकड ताटात काढून घ्या.
 • तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून चांगली मळावी.
 • ह्या मळलेल्या उकडीचे बेताच्या आकाराचे लांबट गोळे करावे.
 • मोदकपात्रात पाणी घालून त्यावर चाळण ठेवावी.
 • चाळणीवर एखादा कपडा किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालावा.
 • त्यावर हे गोळे ठेवून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावे.
 • नंतर खाली उतरवून शेवेच्या सोऱ्याने वरील पिठाच्या शेवयाचे चवंगे तूप लावलेल्या ताटात पाडावे.
 • नारळाचे बेताचे जाडसर दूध काढा.
 • त्यात साखर किंवा गूळ घालून बेताचे गोड करावे.
 • वेलदोड्याची पूड घालावी.
 • या दुधात शेवया घालून खायला द्या.

तांदळाच्या शेवया

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.