बुंदीचे लाडू - पाककृती

बुंदीचे लाडू, पाककला - [Bundiche Ladoo, Recipe].
बुंदीचे लाडू - पाककृती | Bundiche Ladoo - Recipe

बुंदीचे लाडू


बुंदीचे लाडूबुंदीचे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • २५० ग्रॅम डाळीचे पीठ (मोठ्या अडीच वाट्या)
 • २५० ग्रॅम तूप
 • ३५० ग्रॅम साखर
 • दीड वाटी पाणी (पीठ भिजवण्यासाठी)

बुंदीचे लाडू करण्याची पाककृती


 • डाळीचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या.
 • नंतर त्यात १ चमचा कडकडीत तुपाचे मोहन घालावे व पीठ भिजवावे.
 • गुठळी राहू देऊ नये.
 • भज्याचा पिठाइतपत असावे.
 • नंतर कढईत तूप तापत ठेवावे व बुंदीच्या झाऱ्यावर वरील पीठ थोडे घालून झारा ठोकून बुंदी पाडाव्या.
 • कढईजवळ कढईच्या उंचीपेक्षा जरा उंच येईल असा पाठ धरावा.
 • पाटावर झारा ठोकावा.
 • लालसर रंगावर आल्या की बुंदी काढाव्या अशा सर्व बुंदी पाडून घ्याव्या.
 • प्रत्येक वेळी झारा पाण्याने साफ करून घ्या.
 • साखरेत पाणी घालून एकतारीपेक्षा जरा जास्त असा पाक करावा.
 • पाकात बुंदी टाकाव्या.
 • नंतर बुंदी पाकात मुरल्यावर लाडू वळावे.

बुंदीचे लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.