Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ३३

मनाचे श्लोक - श्लोक ३३ - [Manache Shlok - Shlok 33] वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला.

मनाचे श्लोक - श्लोक ३३ | Manache Shlok - Shlok 33

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३३, वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला

मनाचे श्लोक - श्लोक ३३


वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनी दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनश्चंद्र-सूर्यर्क्षमेर्वादिकं तु
वसत्यञ्जसा यत्स्वरूपे समस्तम् ।
चिरंजीवतां येन नीतौ स्वदासौ
स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ ३३ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३३ - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून बोध करुन देतात की, जोवर मेरुमंदरादि सृष्टिलीला आहे व जोवर चंद्र, सूर्य, तारांगणे व मेघमाळा ही आहेत, तोवर ज्या श्रीरामाने आपले दोन भक्त (मारुती व बिभीषण) या लोकी चिरंजीव केले तो भक्तकैवारी श्रीराम केव्हाही दासाची उपेक्षा करत नाही.

यासंबंधी अध्यात्मरामायणातील एक श्लोक -

यावच्चंद्रश्च सूर्यश्च यावत्तिष्ठति मेदिनी ।
यावन्मम कथा लोके तावद्राज्यं करोत्यसौ ॥

समर्थकृत रामायणाच्या युद्धकांडातील अकराव्या प्रसंगातील हा ५१ वा श्लोक -

म्हणे गा विरा तां पुरीमाजि जावें ।
ध्रुवाचे परी राज्य सूखें करावें ।
शशी सूर्य तारांगणे अंतराळीं ।
असावें सुखी भोगिजे सर्व काळी ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची