Loading ...

मनाचे श्लोक - श्लोक ३२

मनाचे श्लोक - श्लोक ३२ - [Manache Shlok - Shlok 32] अहल्या शिळा राघवें मुक्त केली, पदीं लागतां दिव्य होऊनि गेली.

मनाचे श्लोक - श्लोक ३२ | Manache Shlok - Shlok 32

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३२, अहल्या शिळा राघवें मुक्त केली, पदीं लागतां दिव्य होऊनि गेली

मनाचे श्लोक - श्लोक ३२


अहल्या शिळा राघवें मुक्त केली ।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णितां शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहल्या शिलीभूतदेहाऽपि येन
कृता पादसंस्पर्शतोऽतीव पूता ।
श्रुतिर्यद्यशोवर्णने मौनमाप
स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ ३२॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३२ - अर्थ


गौतममुनींनी त्यांची पत्नी अहल्या हिला घडलेल्या अपराधाबद्दल शाप दिल्यामुळे ती हजारों वर्षे शिळा होऊन तशीच पडली होती. त्यानंतर जेव्हा भगवान श्रीविष्णूंनी रामावतार धारण केला तेव्हा तिच्या उद्धाराची वेळ जवळ आली. विश्वामित्रऋषी यांच्याकडे शिक्षा घेताना एक दिवस राम आणि लक्ष्मण त्यांच्यासोबत मिथिलानगरीस जात होते. मार्गात गौतममुनींचा रिकामा आश्रम त्या सर्वांच्या नजरेस आला. या आश्रमाबाबत राम-लक्ष्मण यांनी विश्वामित्रांकडे चौकशी केली असता त्यांना सर्व हकिकत सांगण्यात आली. हे सांगून विश्वामित्र राम-लक्ष्मणांना घेऊन आश्रमाकडे गेले आणि श्रीरामाच्या अगदी सहज पादस्पर्शाने त्या शिळेची पूर्ववत अहल्या झाली.

म्हणूनच श्रीसमर्थ आपल्याला बोध करुन देत आहेत की जिथे श्रीरामाच्या कृपेने जर शिळा उद्धरु शकते, तर मनुष्याचा उद्धार का नाही होणार? यात मुळी शंका नाहीच!

रामपाईं शिळा जाली दिव्य बाळा ।
तैसाची सोहळा मानवांसी ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची