Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक १८

मनाचे श्लोक १८ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक १८. मना राघवेंवीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ति तूं रे [Manache Shlok 18].

मनाचे श्लोक १८ | Manache Shlok 18

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १८, मना राघवेंवीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ति तूं रे

मनाचे श्लोक १८


मना राघवेंवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे ॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें ।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १८ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो धारयाशां सदा राघवस्य
ततोऽन्यं नरं नैव संकीर्तय त्वम् ।
पुराणानि वेदाश्च यं वर्णयन्ति
नरः श्लाघ्यतामेति तद्वर्णनेन ॥ १८ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १८ - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थ मनाला बोध करवून देत आहेत की, जीवनात एका रामाशिवाय आपण कुठल्याही आशेचा आधार घेता कामा नये. कारण आशा म्हणजे अपेक्षा, मग ती कुठलीही असो, ती दुःख देणारच. तेच जर सतत रामचिंतन घडले तर, सदा सर्वकाळ आनंद, समाधान आणि चिंतामुक्त स्थिती अनुभवायला मिळेल.

समर्थांचा मनाला अजून एक बोध असा की, एका पुरुषोत्तमा शिवाय कोणाचीही कीर्ति वर्णू नकोस. त्यासंबंधी एक ओवी अशी -

सेवकु मानवीयांचे ।
कष्टती बहुतांपरी ।
सेविला देव देवांचा ।
तेणें मी धन्य जाहालों ।
नीच हे मानवी प्राणी ।
नीचाश्रय कामा नये ।
महत्कीर्ति श्रीरामाची ।
फावला महदाश्रयो ॥


मनाचे श्लोक १८ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची