पिझ्झा, पाककला - [Pizza, Recipe] नेहमीच्या त्याच त्याच चवीचा खायला कंटाळा येतो म्हणून पिझ्झा हा एक इटालियन पदार्थ आहे जो मैद्याच्या पोळीवर टोमॅटो सॉस, चीज तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून भाजला जातो आणि हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतो.
सर्वांचा आवडीचा इटालियन पदार्थ पिझ्झा
पिझ्झा ब्रेड साठी लागणारा जिन्नस
- २५० ग्रॅम मैदा
- १० ग्रॅम खमीर
- १ छोटा चमचा साखर
- ४ लहान चमचे तूप
- १/२ छोटा चमचा मीठ
मसाल्यासाठी लागणारा जिन्नस
- १/२ किलो टोमॅटो
- २ कांदे
- ४ कळी लसूण
- १ तुकडा आले
- १ सिमला मिरची
- १ कप बारीक चिरलेली पत्ता कोबी
- मीठ चवीनुसार
- १/२ लहान चमचा लाल मिरची पावडर
- १/४ लहान चमचा गरम मसाला
- १ लहान चमचा साखर
- १ लहान चमचा कॉर्नफ्लावर
- १०० ग्रॅम चीज
‘पिझ्झा’ची पाककृती
- मैद्यात मीठ, साखर व मीठ व खमीर टाका व तूप आणि पाणी टाकून मळून घ्या. आर्ध्या तास ठेवल्यानंतर त्याचे चार लहान गोळे तयार करा. थोडे जाड लाटून घ्या.
- ओव्हनमध्ये २०० डिग्री से. ला १० मिनीटे १-२ करुन चारही पोळ्या ( पिझ्झा ब्रेड ) भाजून घ्या. हा तयार आहे आपला पिझ्झा बेस.
- टॉमेटो, कांदा, आलं, लसूण बारीक चिरुन एका कढईत टाकून भाजून घ्या. पूर्ण पाणी शिजल्यावर लाल मिरची पावडर, साखर, मीठ व गरम मसाला टाका.
- एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्याच्यात कॉर्नफ्लावर टाका. हे मिश्रण गॅसवरील टॉमेटोच्या मिश्रणात टाका. मिश्रण जाडसर झाल्यावर त्याच्यात सिमला मिरची व पत्ता कोबी बारीक चिरुन टाका. २ मिनीटे भाजून गॅस बंद करा.
- आता पिझ्झा बेसवर हे मिश्रण पसरून त्याच्यावर चीज किसा. हा ब्रेड ओव्हनमध्ये १५० डिग्री से. ला ७ ते ८ मिनीटे ठेवा.
- आता बाहेर काढून त्याच्यावर टोमेटो सॉस टाकून गरम वाढा. खाण्याच्या सोईकरता चाकूने चिरुन लहान तुकडे करा.
जर पिझ्झा बेस बाजारात मिळत असेल तर तेही आणून वर दिल्यानुसार मसाला टाकून पिझ्झा तयार करा.
यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या उदा. स्वीट कॉर्न, ऑलिव्ह, कांदा, टोमॅटो वगैरे तसेच चिकन घालून नॉन-व्हेज पिझ्झा बनवू शकता.
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ
अभिप्राय