Loading ...

मनाचे श्लोक २५

मनाचे श्लोक २५ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक २५. मना वीट मानूं नको बोलण्याचा, पुढें मागुता राम जोडेल कैंचा [Manache Shlok 25].

मनाचे श्लोक २५ | Manache Shlok 25

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २५, मना वीट मानूं नको बोलण्याचा, पुढें मागुता राम जोडेल कैंचा

मनाचे श्लोक २५


मना वीट मानूं नको बोलण्याचा ।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा ॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे ।
पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥ २५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २५ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनस्ते मदुक्तिर्हितैवेति मान्या
न चेद् राम-पादाब्ज-लब्धिः कुतस्ते ।
सुखाप्ति-क्षणे जायते सौख्यमेव
ततः सर्वनाशः स्थिरं नैव किंचित् ॥ २५ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २५ - अर्थ


या श्लोकात श्रीसमर्थ मनाला समजवत आहेत की, मना, तू माझ्या बोलण्याचा कंटाळा करु नको. कंटाळा करुन नामस्मरण सोडलेस तर तुला श्रीरामाची प्राप्ती कशी होईल?

काळ हा शेवटी काळच असतो. तो कधी सुखाच्या पलंगावर निजवेल तर कधी दुःखाच्या दरीत कोसळून देईल. काळाचा काही नेम नाही, तो नेहमी पुढे सरकतच असतो. आज आपल्याकडे सर्व काही आहे, त्यामुळे सुखाचा अनुभव येत आहे पण उद्या एका क्षणात, होत्याचे नव्हते होऊन आपल्या जवळ काहीही शिल्लक रहाणार नाही. म्हणूनच समर्थ तात्पर्य सांगत आहेत की -

या नरदेहाचेनि लागवेगें ।
सार्थक करावें संतसंगें ।
नीच योनी दुःख मागें ।
बहुत भोगिलें ॥

कोण समयो येईल कैसा ।
याचा न कळे किं भर्वसा ।
जैसे पक्षी दाही दिशा ।
उडोन जाती ॥


मनाचे श्लोक २५ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची