Loading ...

मनाचे श्लोक २६

मनाचे श्लोक - श्लोक २६ - [Manache Shlok - Shlok 26] देहेरक्षणाकारणें यत्न केला, परी शेवटीं काळ घेउन गेला.

मनाचे श्लोक २६ | Manache Shlok 26

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक २६, देहेरक्षणाकारणें यत्न केला, परी शेवटीं काळ घेउन गेला

मनाचे श्लोक - श्लोक २६


देहेरक्षणाकारणें यत्न केला ।
परी शेवटीं काळ घेउन गेला ॥
करीं रे मना भक्ति या राघवाची ।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥ २६ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक २६ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


कृतः केनचिद् देह-रक्षा-प्रयत्नः
स देहः क्षणेनैव कालेन नीतः ।
अतस्त्वं मनो रामचंद्रं भजस्व
प्रमुञ्चान्तरात् सर्वचिन्तां भवस्य ॥ २६॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक २६ - अर्थ


श्रीसमर्थांनी या श्लोकाला अनुसरुन एक सुंदर ओवी मांडली आहे. ते म्हणतात म्हणतात -

समर्थ म्हणतात की मिळालेला देह कायमस्वरूपी टिकवण्यासाठी कितीही धडपड केली, त्याचे रक्षण करण्या करता कितीही उपाय करुन पाहिले तरी ते व्यर्थच ठरतील. कारण देह नश्वर आहे. निसर्गाच्या नियमा प्रमाणे एक दिवस काळ येऊन त्याला घेऊन जाणारच आहे. त्यामुळे हाती असलेला अमुल्य वेळ वाया न घालवता, अखंडपणे श्रीरामाची भक्ति करावी

या कारणें सावधान असावें ।
जितुकें होईल तितुकें करावें ।
भगवत्कीर्तिनें भरावें ।
भूमंडळ ॥

अशा प्रकारे वागल्यास, भवाची म्हणजे जन्ममरणाची चिंता कायमची सुटेल, असा समर्थांचा येथे उपदेश आहे.


मनाचे श्लोक २६ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची